पुणे शहरात दिवसभरात २ हजार ५८७ करोनाबाधित वाढले असून, ११ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर एकूण बाधितांची संख्या आता २ लाख २३ हजार ७९७ झाली आहे. आजपर्यंत ४ हजार ९८० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ७६९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ३ हजार ७८५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १ हजार २४८ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, ६१५ जण करोनामुक्त झाले आहेत. तर पाच रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख १६ हजार ८९६ वर पोहचली आहे. यापैकी १ लाख ७ हजार ९६ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ७४९ असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

चिंताजनक : राज्यात दिवसभरात २३ हजार १७९ करोनाबाधित वाढले, ८४ मृत्यू

राज्यातील करोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस पुन्हा एकदा अधिकच झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. अनेक शहारांमध्ये तर लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. याशिवाय, लसीकरणाचा वेग आणखी वाढवणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सांगितलेलं आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात २३ हजार १७९ नवीन करोनाबाधित वाढले असून, ८४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात ५३ हजार ८० रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ टक्के एवढा आहे. याशिवाय, राज्यात आज रोजी एकूण १,५२,७६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.