News Flash

Coronavirus : पुण्यात दिवसभरात ३ हजार २८६ करोनाबाधित वाढले, २३ रुग्णांचा मृत्यू

जाणून घ्या लॉकडाउन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले आहेत

संग्रहीत

पुणे शहरात दिवसभरात ३ हजार २८६ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, २३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील आजपर्यंतची एकूण बाधितांची संख्या २ लाख ४७ हजार ६२९ झाली आहे, तर ५ हजार १३७ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज दिवसभरात १ हजार २०० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी देखील सोडण्यात आले. आजअखेर २ लाख १३ हजार ९१४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

देशात करोना रुग्णसंख्या वाढत असून यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक करोना रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात आहेत. यामध्ये पुण्याचाही समावेश आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक शहरांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीसंबंधी माहिती दिली असून लॉकडाउनसंबंधीही भाष्य केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

पुण्यात लॉकडाउन? अजित पवारांचं मोठं विधान

“मोठ्या प्रमाणात करोनाचं संकट वाढू लागलं आहे. मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण आवाहन करत आहेत. काही शहरांमध्ये प्रमाण वाढलं आहे. पालकमंत्री नात्याने उद्या पुण्यात लोकप्रतिनिधींना बोलावालं असून दर शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक होत असते. या बैठकीत आम्ही निर्णय घेतो. लॉकडाउनसंबंधी मतांतर आहे, पण नियमांचं पालन केलं पाहिजे यावर एकमत आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Coronavirus : राज्यात दिवसभरात १११ रूग्णांचा मृत्यू, ३५ हजार ९५२ करोनाबाधित वाढले

आज दिवसभरात राज्यात १११ रूग्णांचा मृत्यू झाला तर ३५ हजार ९५२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,६२,६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 8:58 pm

Web Title: coronavirus 3 thousand 286 corona patients increased in pune during the day msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुण्यात लॉकडाउन? अजित पवारांचं मोठं विधान
2 औट घटके ची स्वच्छता
3 लोकजागर : पानी रे पानी, तेरा रंग कैसा?
Just Now!
X