पुणे शहरात दिवसभरात ३ हजार ५९४ करोनाबाधित वाढले असून, २४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता २ लाख ५१ हजार २२३ झाली आहे. आजपर्यंत ५ हजार १६१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज २ हजार १६५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर आजअखेर २ लाख १६ हजार ७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus – राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १ हजार ८२५ तर महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील ३९ जण करोनाबाधित रुग्ण आढळले असून, ८८६ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ३० हजार ५७२ वर पोहचली आहे. यापैकी, १ लाख १३ हजार ६४८ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार २६२ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus – राज्यात दिवसभरात ३६ हजार ९०२ करोनाबाधित वाढले, ११२ रूग्णांचा मृत्यू

राज्यात करोना संसर्ग अतिशय झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार येत्या रविवापासून (२८ मार्च ) राज्यात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. तर, राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी  काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.