पुणे शहरात दिवसभरात ३ हजार ४६३ करोनाबाधित वाढले असून, ३० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता २ लाख ५४ हजार ६८६ झाली आहे. आजपर्यंत ५ हजार १९१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज २ हजार ५८४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख १८ हजार ६६३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

“नियम पाळा, अन्यथा लॉकडाऊन!” पुणे-पिंपरी चिंचवडकरांना अजित पवारांचा २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम!

मागील काही दिवसांपासून पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढू लागलेली असताना प्रशासनासाठी मोठी चिंतेची बाब ठरली होती. गंभीर बाब म्हणजे पुण्यात दररोज होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. काही दिवशी हा आकडा मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पुण्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. “घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Coronavirus : राज्यात दिवसभरात १६६ मृत्यू , ३५ हजार ७२६ करोनाबाधित वाढले

तर, राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून येत आहेत व रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आता करोना प्रतिबंधात्मक नियमांची अतिशय कडक अंमलबजावणी करत आहे. शिवाय, येत्या रविवापासून राज्यात रात्रीची जमावबंदी देखील घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय काल घेतला आहे. दरम्यान आज दिवसभरात राज्यात १६६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ३५ हजार ७२६ नवीन करोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.२ टक्के एवढा आहे.