पुणे शहरात आज दिवसभरात ७७९ नवे करोनाबाधित आढळले असून, ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ९१५ झाली आहे. आज अखेर ३ हजार ४०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार १०५ रुग्णांची तब्येत ठीक झाल्याने सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर १ लाख २२ हजार २८१ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात ५५४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ९५९ जण आज करोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७६ हजार ६३३ वर पोहचली असून यापैकी ६३ हजार ५८० जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ६७६ आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढत असला तरी, दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. राज्यात आज १९ हजार ९३२ जणांची करोनावर मात केली आहे. तर, ११ हजार ९२१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७७.७१ टक्क्यांवर पोहचला आहे.

तर, आज दिवसभरात राज्यात ११ हजार ९२१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १३ लाख ५१ हजार १५३ वर पोहचली आहे. राज्यातील एकूण १३ लाख ५१ हजार १५३ करोनाबाधितांमध्ये २ लाख ६५ हजार ३३ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १० लाख ४९ हजार ९४७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३५ हजार ७५१ जणांच्या संख्येचा समावेश आहे.