News Flash

Coronavirus – पुण्यात दिवसभरात ४ हजार ४२६ नवीन करोनाबाधित, २८ रुग्णांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात २ हजार २७५ करोनाबाधित आढळले

संग्रहीत

पुणे शहरात दिवसभरात ४ हजार ४२६ करोनाबाधित वाढले असून, २८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या २ लाख ५९ हजार ५१२ झाली आहे. आजपर्यंत ५ हजार २१९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान २ हजार १०७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख २० हजार ७७० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २ हजार २७५ करोनाबाधित आढळले असून १ हजार २८६ जण करोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर १३ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ३४ हजार ५४१ वर पोहचली असून यापैकी, १ लाख १६ हजार १७७ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार ६४३ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 9:25 pm

Web Title: coronavirus 4 thousand 426 new corona patients increased in pune in a day msr 87 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणे : देहूत संचारबंदी; तुकाराम बीज सोहळ्यासाठी केवळ ५० लोकांनाच मंदिरात उपस्थित राहण्याची प्रशासनाकडून परवानगी
2 Coronavirus : पुण्यात दिवसभरात ३० रूग्णांचा मृत्यू, ३ हजार ४६३ करोनाबाधित वाढले
3 पुणे : लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात होळीनिमित्त १०० किलो द्राक्षांची आकर्षक आरास
Just Now!
X