News Flash

Coronavirus – पुण्यात दिवसभरात ५ हजार ७२० करोनाबाधित वाढले, ३५ रूग्णांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २ हजार ८३२ नवीन करोना रूग्ण आढळले

संग्रहीत

पुणे शहरात दिवसभरात ५ हजार ७२० करोनाबाधित वाढले असून, ३५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या २ लाख ८३ हजार ८१९ झाली आहे. आजपर्यंत ५ हजार ४११ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज ३ हजार २९३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर आजअखेर २ लाख ३८ हजार ८९० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २ हजार ८३२ तर महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील ७३ जण करोनाबाधित आढळले. तर, १ हजार ८५४ जण करोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर दिवसभरात १७ जणांचा उपचारा सुरू असताना मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ४७ हजार ५४६ वर पोहचली असून यापैकी, १ लाख २४ हजार ८४४ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ४९३ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

चिंताजनक : राज्यात दिवसभरात ४९ हजार ४४७ करोनाबाधित वाढले, २७७ रूग्णांचा मृत्यू

दरम्यान, राज्यात करोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन सुरू करावा लागण्याची चिन्हं दिसत आहेत. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ४९ हजार ४४७ करोनाबाधित वाढले असून, २७७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.८८ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५५ हजार ६५५ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मिनी लॉकडाउनला व्यापारी, नागरिकांकडून प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून(शनिवार) मिनी लॉकडाउनला सुरूवात झाली असून, नागरिक आणि व्यापारी वर्गातून या मिनी लॉकडाउनला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. पहिल्याच दिवशी बरोबर सायंकाळी सहा वाजता शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून पिंपरीला पाहिलं जातं त्या ठिकाणी देखील वेळेत दुकाने बंद करून प्रशासनाला सहकार्य करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 8:43 pm

Web Title: coronavirus 5 thousand 720 corona patients increased in pune during the day msr 87 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये मिनी लॉकडाउनला व्यापारी, नागरिकांकडून प्रतिसाद
2 पुण्यात गिरीश बापट पोलिसांच्या ताब्यात, ‘मिनी लॉकडाउन’च्या पहिल्याच दिवशी भाजपाचं आंदोलन
3 पुण्यातील हृदयद्रावक घटना, अपघातात अवघं कुटुंब झालं उद्ध्वस्त; आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत
Just Now!
X