30 October 2020

News Flash

Coronavirus : दिवसभरात पिंपरी-चिंचवडमध्ये ५२ रुग्णांचा मृत्यू ; पुण्यात ३९ जण दगावले

पुण्यात १ हजार ६५८ नवे करोनाबाधित; पिंपरी-चिंचवडमधील करोनाबाधितांची संख्या ७० हजाराच्या उंबरठ्यावर

(प्रतिकात्मक छायाचित्र)

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस राज्यात अधिकच वाढतच आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोनाबाधितांच्या संख्येत आघाडीवर आहे. याचबरोबर पिंपरी-चिंचवडमध्ये देखील करोना रुग्णसंख्येह करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आज (शनिवार) दिवसभरात पिंपरी-चिंचवडमध्ये ५२ रुग्णांचा तर पुण्यात ३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार ६५८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ३० हजार ८१ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार ४६ वर पोहचली आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार २४८ रुग्ण बरे झाल्याने, त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर १ लाख ९ हजार ३७१ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजारांचा उंबरठ्यावर पोहचली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९८७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, ५२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू (यातील शहरातील २५ जण असून, महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील २७ जणांचा समावेश) झाला आहे.

आज दिवसभरात ९०३ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ७० हजारांच्या उंबरठ्यावर असून ६९ हजार ४२३ वर पोहचली आहे. यापैकी, ५४ हजार ४३२ जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ४४४ एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2020 9:02 pm

Web Title: coronavirus 52 patients die in pimpri chinchwad in one day 39 die in pune msr 87 kjp 91 svk 88
टॅग Coronavirus
Next Stories
1 दिघी पोलीस ठाण्यात मद्यधुंद हवालदाराचा गोंधळ; महिला पोलिसाला शिवीगाळ
2 पुणेकरांनी मला ऱ्हस्व, दीर्घ शिकवलं – के. व्यंकटेशम
3 थकबाकीमुळे पीएमपी अडचणीत
Just Now!
X