01 October 2020

News Flash

करोनाच्या भीतीने पिंपरी-चिंचवडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

डॉक्टरांनी करोना चाचणी करण्याचा दिला होता सल्ला

सतत ताप, खोकला आणि थंडी असल्यामुळे डॉक्टरांनी एका ६७ वर्षीय व्यक्तीला करोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. पण, त्या व्यक्तीनं करोनाच्या भीतीनं गळफास लावून आत्महत्या केली. पिंपरी चिंचवड येथे ही घटना घडली आहे. शिवाजी मारुती होळकर रा. गव्हाणे वस्ती भोसरी, असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नागरिकाचे नाव आहे

पिंपरी-चिंचवडमधील शिवाजी होळकर यांनी करोनाच्या भीतीपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मयत व्यक्तीनं आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये ताप, खोकला आणि थंडी असल्याने डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी करोना असल्याची भीती दाखवली अस म्हटलं असून आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये असेही म्हटलेय . या प्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीमधील गव्हाणे वस्ती येथे शिवाजी होळकर हे कुटुंबासह राहतात. गेल्या आठ दिवसांपासून त्यांना थंडी, ताप आणि खोकला येत असल्याचे त्यांनी डॉक्टरांना दाखवले. मात्र, तुम्हाला कोरोनाची लक्षण आहेत. तुम्ही टेस्ट करून घ्या अस अधिक उपचारासाठी त्यांना सांगितले होते. मात्र, आज शुक्रवारी पहाटे च्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत शिवाजी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात शिवाजी होळकर यांनी म्हटलं आहे की, मला गेल्या आठ दिवसांपासून थंडी, ताप आणि खोकला येत होता. डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी करोनाची भीती घातली, मी आत्महत्या करत आहे यासाठी कोणाला जबाबदार धरू नये असं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांनी कोणत्या डॉक्टरांकडे तपासणी केली हे समजू शकले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 2:12 pm

Web Title: coronavirus 67 years old man suicide nck 90 kjp 91
Next Stories
1 भेटी न घेण्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचं फर्मान
2 सुविधांअभावी रुग्णांची हेळसांड कायम
3 विजय चित्रपटगृह लवकरच काळाच्या पडद्याआड
Just Now!
X