पुणे शहरात दिवसभरात ७ हजार १० करोनाबाधित वाढले असून, ४३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आजअखेर ३ लाख १२ हजार ३८२ इतकी झाली आहे. तर, ५ हजार ६१० रूग्णांचा आजपर्यंत मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज ४ हजार ९९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ५७ हजार ८३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus – राज्यात दिवसभरात ५६ हजार २८६ करोनाबाधित वाढले, ३७६ रूग्णांचा मृत्यू

पुण्यात  रुग्णांना व्हेंटिलेटर बेड्स मिळत नसल्याची ओरड होत आहे. यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र लिहून पुण्यातील आरोग्य व्यवस्थेची व्यथा मांडली आहे.

पुण्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर! महापौर मुरलीधर मोहोळ यांची केंद्र आणि राज्य सरकारला विनंती

राज्यात दिवसेंदिवस करोना विषाणूचा संसर्ग अधिकच वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात लसीकरण कार्यक्रम सुरू असताना, दुसरीकडे रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल ५६ हजार २८६ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर ३७६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५७ हजार २८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, आज रोजी राज्यात एकूण ५,२१,३१७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, आज ३६ हजार १३० रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत.