News Flash

Coronavirus : पुण्यात दिवसभरात ७५३ नवीन करोनाबाधित, ७ रुग्णांचा मृत्यू

७०० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

संग्रहीत

पुणे शहरात दिवसभरात ७५३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या २ लाख ९ हजार ८३ झाली आहे. आजपर्रयंत ४ हजार ८९७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज ७०० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर १ लाख ९६ हजार ७५१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, राज्यातील करोनासंसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून येत आहेत, तर मृत्युंच्या संख्येतही भर सुरूच आहे. मागील काही दिवसांमध्ये दररोज आठ हजारांच्या वर नवीन करोनाबाधित आढळले, काल ही संख्या ११ हजारांच्या वर पोहचली होती. करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा करोनाबाधितांचीच संख्या अधिक आढळून येत होती. मात्र आज अनेक दिवसानंतर दिवसभरातील करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळून आली आहे.

Coronavirus – राज्यात आज ९ हजार ६८ रुग्ण करोनामुक्त, ८ हजार ७४४ नवीन करोनाबाधित

राज्यात आज ९ हजार ६८ रूग्ण करोनामुक्त झाले असुन, ८ हजार ७४४ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, २२ रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ९७ हजार ६३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 9:29 pm

Web Title: coronavirus 753 new corona patients in pune today msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुण्याला अर्थसंकल्पातून काय मिळालं?; वाचा महत्त्वाच्या घोषणा
2 महिला दिन विशेष: २१ व्या शतकातील हिरकणी… नऊवारी नेसून सात मिनिटांमध्ये सर केला नागफणी सुळका
3 महिला दिन विशेष : खो खोचे मैदान ते पुण्यात सहायक पोलीस निरीक्षक; सुजाता शानमेंचा प्रेरणादायी प्रवास
Just Now!
X