News Flash

Coronavirus – पुण्यात दिवसभरात ८५३ करोनाबाधित वाढले, पाच रुग्णांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ४८३ नवे करोनाबाधित

संग्रहीत

पुणे शहरात दिवसभरात ८५३ करोनाबाधित रुग्ण वाढले असुन, पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. एकूण बाधितांची संख्या आता २ लाख ४ हजार ६४९ झाली आहे. आजपर्यंत ४ हजार ८६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ३८८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ९४ हजार २२९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ४८३, तर महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील २२ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय १५५ जण करोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित संख्या १ लाख ६ हजार ७२८ वर पोहचली आहे. यापैकी, १ लाख १ हजार १०० जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ३९८ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus – राज्यात आज ९ हजार ८५५ करोनाबाधित वाढले, ४२ मृत्यू

राज्यातील करोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय मृत्युंची संख्येतही भर पडतच आहे. सलग तीन दिवस ८ हजारपेक्षा अधिक करनोाबाधित आढळून आल्यानंतर काल, ही संख्या काहीशी कमी झाली होती मात्र आज पुन्हा नव्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज दिवसभरात राज्यात ९ हजार ८५५ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, आज ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ८२ हजार ३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 9:17 pm

Web Title: coronavirus 853 coronavirus cases increased in pune in a day five patients died msr 87 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुंबईच्या तोतया ‘एसीपी’ला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
2 पुण्यात बिबवेवाडी परिसरात गोडाऊनला भीषण आग
3 पुणे : इंधन दरवाढीविरोधात महिला काँग्रेस आक्रमक, पंतप्रधान मोदींच्या फोटोला घातला चपलांचा हार
Just Now!
X