News Flash

Coronavirus : पुणे शहरात दिवसभरात 87 पॉझिटिव्ह, सात मृत्यू

शहरातील करोनाबाधितांची संख्या 2 हजार 824 वर पोहचली

संग्रहित छायाचित्र

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात झपाट्याने वाढत आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात करोनाबाधितांची संख्या कमालीची वाढली आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 87 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सात जणांचा करोरनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात दिवसभरात 87 करोना बाधित रुग्ण आढळले असून सात जणांचा बळी गेला आहे.  आज अखेर शहरातील करोनाबाधितांची संख्या 2 हजार 824 झाली आहे. तर आतापर्यंत 163 मृतांची संख्या झाली आहे.  आज 14 दिवसानंतर 168 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर 1 हजार 163 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पुणे विभागातील 1 हजार 503 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 742 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 43 आहेत. आतापर्यंत विभागात एकुण 193 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 128 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 8:44 pm

Web Title: coronavirus 87 positive seven deaths in a day in pune city msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 विलगीकरणामुळे लाखोंचा भुर्दंड
2 खर्च कमी करण्यासाठी सारे काही ऑनलाइन!
3 मद्य खरेदीसाठी पहिल्याच दिवशी एक हजार ई-टोकन
Just Now!
X