पुणे शहरात दिवसभरात ९०४ करोनाबाधित रुग्ण वाढले. तर आजअखेर २ लाख ५ हजार ५५३ इतकी एकूण बाधितांची संख्या झाली आहे. दरम्यान आज ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण ४ हजार ८७६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ५६२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ९४ हजार ७९१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ५०२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ३५९ जण करोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार २३० वर पोहचली असून, यापैकी १ लाख १ हजार ४५९ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ३५७ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus – राज्यात दिवसभरात ६० रुग्णांचा मृत्यू ; ८ हजार ९९८ नवीन करोनाबाधित

राज्यात करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत.  शिवाय, मृत्युंच्या संख्येतही भर पडतच आहे. यामुळे सर्वसामान्यांसह सरकारचीही चिंता वाढत आहे. आज (गुरूवार) दिवसभरात  ८ हजार ९९८ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ टक्के आहे. याशिवाय आज दिवसभरात ६ हजार १३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, आजपर्यंत एकूण २०,४९,४८४ करोनाबाधित रुग्ण घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  (रिकव्हरी रेट) ९३.६६ टक्के एवढा झाले आहे.