News Flash

#coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळला आणखी एक रुग्ण

पुण्यातील रुग्णांचा आकडा १६ वर पोहचला

पिंपरी-चिंचवड शहरात करोना व्हायरसची बाधा झालेला आज आणखी एक रुग्ण आढळला आहे. काल पाच रुग्ण आढळले होते त्यामुळे केवळ २४ तासांत पिंपरी-चिंचवडमध्ये सहा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा रुग्ण जपान व दुबईवरून भारतात परतला होता. काल त्याची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत तो पॉझिटिव्ह आढळला. सध्या स्थितीस पिंपरी-चिंचवडमधील रूग्णांची संख्या ९ व पुणे शहारातील रूग्ण संख्या ७ आहे. दोन्ही मिळून पुण्यातील रुग्णांचा आकडा १६ झाला आहे. तर, संपूर्ण राज्यातील रुग्णांची संख्या ३३ वर पोहचली आहे.

या अगोदर पुणे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णासंबंधी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती.  ’सध्या जिल्ह्यात १५ करोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे १६ जणांची प्रकृती बरी झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली आहे. काल काहीजण परदेशातून आले होते. त्यातील तीन जणांना करोनासदृश्य लक्षणं दिसली आहेत,’ असं ते म्हणाले होते.

राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. संसर्गजन्य आजार असलेल्या करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. याचा भाग म्हणून गर्दी होणारी ठिकाणं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचंच पुढचं पाऊल म्हणजे सरकार करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करोनाबाधित रुग्णानं विलगीकरणास सहकार्य केलं नाही, तर नजरकैदेत ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 7:55 pm

Web Title: coronavirus another patient found in pimpri chinchwad msr 87
Next Stories
1 Coronavirus : चंद्रकांत पाटलांनाच आदेशाचा विसर; घेतली शेकडो पदाधिकाऱ्यांची बैठक
2 करोनाबाधित रुग्णावर किंवा त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्यास कारवाई करणार
3 पुणे : प्रशासनासमोर नवं आव्हान; ९३ जणांच्या ग्रुपमधील एक जण करोनाबाधित
Just Now!
X