27 September 2020

News Flash

CoronaVirus : पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या छतावर नमाजसाठी गर्दी; 13 जणांवर गुन्हा दाखल

सध्या सार्वजनिक प्रार्थनास्थळं बंद आहेत; नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे

करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. यात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर अवघ्या देशात सर्व धर्मांच्या सार्वजनिक प्रार्थना स्थळांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मागे नागरिकांनी एकत्र जमू नये हा हेतू आहे. मात्र असे असूनही पिंपरी-चिंचवड शहरात मात्र शासन निर्णयाकडे सर्रास दुर्लक्ष करत ४० ते ५० जणांनी एकत्र येऊन एका इमारतीच्या छतावर नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे गर्दी करू नका असे आवाहन पोलीस प्रशासन करत असून दुसरीकडे मात्र काहीजण पोलिसांना दाद देत नसल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष बिभीषण सपकाळ यांनी फिर्याद दिली आहे.

करोनाला अटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, असे जरी असले तरी दुसरीकडे काही नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे करोनाला नियंत्रणात आणणे कठीण होत आहे. एकीकडे देशभरासह महाराष्ट्रात मंदिरे, प्रार्थनास्थळ नागरिकांसाठी बंद करण्यात आलेली असताना, दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात चिखली परिसरात काही जणांनी एकत्र येत एका इमारतीच्या छतावर सामूहीक नमाज पठण केले. यावेळी ४० ते ५० जणांची उपस्थिती  असल्याचे एका फोटोद्वारे समोर आल्यानंतर चिखली पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली आहे. एकुण १३ जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व व्यक्तींवर कलम १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदासह इतर कलम लावण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेले करोना विषाणूचे थैमान थांबवायचे असेल तर गर्दी न करणं महत्वाचे आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 7:38 pm

Web Title: coronavirus crowd for namaz at the roof of a building in pimpri chinchwadreported crimes against 13 people msr 87 kjp 91
Next Stories
1 Video : करोनाचे अरिष्ट दूर होण्यासाठी गाऱ्हाणे
2 CoronaVirus : मोदींशी संवाद साधणाऱ्या डॉ. बोरसे यांचा अंदाज; ऑगस्टपर्यंत भारतातील आकडा शून्यावर येईल
3 Good News : पिंपरी-चिंचवडमधील एकाच कुटुंबातील चार जणांसह तरुण करोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज
Just Now!
X