News Flash

Coronavirus : होम कॉरंटाईनचा आदेश डावलून पुण्यात फिरणारे आठ परदेशी ताब्यात

गुन्हा दाखल, तबलिगी जमातचे काम करण्यासाठी टांझानियामधून आल्याची माहिती

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस देशात वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. मात्र त्याच दरम्यान दिल्ली येथील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमास एकाच ठिकाणी आलेल्या नागरिकांच्या मोठ्या संख्येने देशात करोना आजाराच्या रुग्णांत वाढ होण्यास एक प्रकारे मदत झाली आहे. यातील सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू असताना. होम कॉरंटाईनचे आदेश दिलेले असुनही पुण्यात तबलिगी जमातीचे काम करत फिरणार्‍या टांझानियामधील आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथून टांझानिया देशातील सुलतान हारुना नगाउगे, आशा मोहम्मदी इस्माइली, सेलेमानी आबास मोताई, जास्मीन जुमा मफरू, अथुमनी इददी मवांगिया, रामाधनी मोहम्मद बलाई, सौमु स्वाहीबू हसन, जैनाबु रामाधनी जुमा  हे आठ  जण 11 फेब्रुवारीला पुण्यात आले तेव्हा त्यांची नायडू रूग्णालयात करोना व्हायरसची तपासणी करण्यात आली होती. या सर्वांची तपासणी तेव्हा निगेटिव्ह आली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून होम त्यांना होम कॉरंटाईनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत, शहरातील अनेक मशीदीध्ये जाऊन तबलिगी जमातचे ते काम करत असल्याची माहिती पुढे आली.

परिणामी या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्या सर्वांचा व्हिसाही जप्त करण्यात आला आहे. आता त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांची काल तपासणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. आता त्या सर्वांना बोपोडी येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अधिक तपास समर्थ पोलीस स्टेशन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 9:08 am

Web Title: coronavirus eight foreigners detained in pune who disobeying home quarantine order msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दिवसा चटका अन् रात्री उकाडय़ात वाढ
2 मुंबई-पुणे महामार्गावरील ऐतिहासिक अमृतांजन पूल जमीनदोस्त
3 Coronavirus: पुण्यात करोनामुळं चोवीस तासात तिघांचा बळी; शहरात एकूण पाच जणांचा मृत्यू
Just Now!
X