12 August 2020

News Flash

Coronavirus : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोफत वाहन दुरुस्ती सेवा

स्कूटर-मोटरसायकल रिपेअर रीसर्च असोसिएशनकडून मदतीचा हात

करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना स्कूटर मोटरसायकल रिपेअर रीसर्च असोसिएशनकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या दुचाकीत बिघाड झाल्यास त्याची मोफत दुरुस्ती करण्याचे काम असोसिएशनकडून करण्यात येत आहे.

डॉक्टर, परिचारिका, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, पोलिस दल आणि पत्रकारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश होतो. या कर्मचाऱ्यांची दुचाकी बिघडल्यास त्यांनी असोसिएशनकडून मोफत सेवा पुरवण्यात येत आहे. मध्यवर्ती भागासह उपनगरातील सुमारे ३०० गॅरेजचालक असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून असोसिएशनने पुढे येत मोफत दुचाकी दुरुस्ती सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील काही दिवसांत सुमारे 40 दुचाकी दुरुस्त करून देण्यात आल्या आहेत. दुचाकीत बिघाड झाला असल्यास आणि एखादा स्पेअर पार्ट बसवावा लागल्यास तेवढ्या पार्टचीच किंमत घेतली जाते. अन्य सेवेसाठी शुल्क आकारले जात नाही. दुचाकीत बिघाड झाल्यास दुरुस्त करण्यासाठी  ९८२३०५५६६५, ९८२२०११६९९, ९८२३१३०९२८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष हरीश अनगोळकर, सचिव धनंजय काबरा, रमेश इंगळे, सचिन पवार यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 10:28 am

Web Title: coronavirus free vehicle repair service for essential service personnel msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : पुण्यात सकाळपासून पाच करोना बाधित रुग्णांचा मृत्यू
2 CoronaVirus Outbreak : अत्यावश्यक सेवा देण्याचे नियोजन
3 टप्प्याटप्प्याने काही भाग सील करण्याचे विचाराधीन
Just Now!
X