पुणे शहरात दिवसभरात ४ हजार ७७ करोनाबाधित वाढले असून, ३६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर शहारातील एकूण बाधितांची संख्या आज अखेर २ लाख ९४ हजार १२१ झाली आहे. आजपर्यंत ५ हजार ४८८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज ३ हजार २४० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ४५ हजार ८९२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २ हजार १५२ तर महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील ४४ जण बाधित आढळले आहेत. याशिवाय, १ हजार ८१५ जण करोनामुक्त देखील झाले आहेत. दरम्यान दिवसभरात १६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ५३ हजार ८० वर पोहचली आहे. यापैकी, १ लाख २८ हजार ४५० जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८०४ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus – राज्यात आज ४७ हजार २८८ करोनाबाधित वाढले, १५५ रूग्णांचा मृत्यू

राज्यात करोनाचा संसर्गाचा उद्रेक पाहायाल मिळत आहे. दिवसेंदिवस करनाबाधितांची संख्या अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर नवीन करनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केले असून, संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी देखील दररोज करोनाबाधित मोठ्यासंख्येने आढळतच आहेत. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार २८८ करोनाबाधित वाढले असून, १५५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,५१,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.