पुणे शहरात दिवसभरात ७२७ नवे करोनाबाधित रुग्ण वाढले असु, सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. आजअखेर शहरातील एकूण बाधितांची संख्या २ लाख १ हजार १८९ वर पोहचली आहे. तर, ४ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३९८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजअखेर शहरात १ लाख ९२ हजार ८९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

राज्यातील करोनाचा संसर्ग आता अधिकच झपाट्याने वाढताना दिसत आहे. शिवाय, करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यात आज दिवसभरात ८ हजार ३३३ नवे करोनाबाधित वाढले असुन, ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४३ टक्के एवढा आहे. तर, आज ४ हजार ९३६ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३५ टक्के आहे.

Coronavirus : राज्यात आज ८ हजार ३३३ नवे करोनाबाधित वाढले, ४८ रुग्णांचा मृत्यू

आजपर्यंत राज्यात एकूण २० लाख १७ हजार ३०३ जण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६७ हजार ६०८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६१,१२,५१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,३८,१५४ (१३.२७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.