News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये ७४ नागरिकांवर गुन्हे; होऊ शकतो एक वर्षाचा कारावास

पोलीस करणार कडक कारवाई

संचारबंदी आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकावर कारवाई करताना पोलीस. (फोटो : कृष्णा पांचाळ)

पिंपरी-चिंचवडमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर जमावबंदी आणि संचार बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही आकडेवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे. गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींना एक वर्षाचा कारावास किंवा एक हजार रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकते असंही त्यांनी सांगितले.

करोना विषाणूचा वाढत प्रादूर्भाव रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाची घोषणा केली. पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश या अगोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अनेक जण वेगवेगळी कारणे देत घराबाहेर पडत आहेत. यात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घराबाहेर पडणाऱ्या एकूण ७४ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे.

संबंधित ज्या व्यक्तींवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना किमान एक वर्षापर्यंत कारावास किंवा एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असंही अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. अन्यथा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा त्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 8:20 pm

Web Title: coronavirus in pune police registered case against people who violate the order bmh 90 kjp91
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: जनतेचं सामाजिक भान; सोशल डिस्टंसिंगद्वारे रंगताहेत गप्पागोष्टी
2 हॉटेलच्या ‘त्या’ कामगारांना पुणेकरांचा मदतीचा हात, नाष्टा-जेवणाची केली व्यवस्था
3 पुणे: ग्रामपंचायतीनं क्वारंटाइन केलेलं गाव प्रशासनानं केलं निर्जंतुक
Just Now!
X