शहरांमुळे पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढल्याचा जिल्हा प्रशासनाचा निष्कर्ष

पुणे : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर ग्रामीण भागात मुंबई, पुणे शहरासह इतर लाल श्रेणीतील जिल्ह्य़ांमधून अनेक प्रवासी दाखल झाले. या प्रवाशांची चाचणी के ल्यानंतर त्यांना करोनाचे निदान झाले आणि त्यामुळे ग्रामीण भागात झपाटय़ाने करोना पसरत गेला, असा निष्कर्ष जिल्हा प्रशासनाने काढला आहे. ग्रामीण भागात के लेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

शहरात ९ मार्चला पहिला करोना रुग्ण आढळून आला होता. ग्रामीण भागात १६ एप्रिलपर्यंत के वळ २० रुग्ण होते. ३ मे आणि १७ मे रोजी टाळेबंदी शिथिल के ल्यानंतर मुंबई, पुण्यासह लाल श्रेणीतील अनेक जिल्ह्य़ांमधून ग्रामीण भागात प्रवासी आले. त्यामुळे आतापर्यंत पुणे ग्रामीण भागात १८३१ करोनाबाधित रुग्ण होते. त्यापैकी १३१२ बरे झाले असून सध्या ५१६ रुग्णांवर उपचार सुरू  आहेत. आतापर्यंत ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२.६३ टक्के , तर मृत्यूचे प्रमाण ४.०६ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत २० लाख नागरिकांची तपासणी के ली आहे.

जिल्ह्य़ातील नऊ लाख ३४ हजार ५३८ कु टुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये ज्वर चिकित्सालयातील एकू ण बाह्य़रुग्ण संख्या दोन लाख ८९ हजार ६९०, तर सर्दी, ताप आणि खोकला असे इतर रुग्ण ११ हजार २०६ होते. त्यापैकी संदर्भित के लेल्या रुग्णांची संख्या ६९६ आहे. सध्या ग्रामीण भागात १३३ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये ११ लाख ४३ हजार २१५ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. इतर व्याधी असलेल्या दोन लाख नऊ हजार ३०, तर इतर व्याधी आणि ६० वर्षांपुढील सहा लाख २८ हजार ३६ व्यक्ती आढळून आल्या आहेत.

शहरावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न

* पुणे महापालिका क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ग्रामीण भागातील रुग्ण पुणे शहराबाहेरच उपचारांस ठेवण्यासाठी विप्रो रुग्णालय (५०४ खाटा, दहा अतिदक्षता विभाग खाटा), नवले रुग्णालय (१०० खाटा, २० अतिदक्षता विभाग खाटा) येथे समर्पित करोना उपचार केंद्र आहे.

* शहरावरील ताण कमी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना करोना प्रतिबंधासाठी जिल्हा वार्षिक नियोजनातून एकू ण ६५.७८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.