करोना व्हायरसचा देशातील वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लॉकडाउन केला आहे. देशात लॉकडाउन असल्यामुळे गोरगरिबांचे हाल सुरू आहेत. हातावर पोट असणाऱ्यांना पोट भरायची पंचायत आहे. या हलाकीच्या परिस्थितीमध्ये देवस्थाने, स्थानिक नेते आणि विविध सामाजिक संस्था मदतीचा हात पुढे करत आहेत. कोथरूड मतदार संघाचे आमदार आणि महाराष्ट्र भाजपाचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदार संघातील लोकांसाठी उपक्रम हातात घेतला आहे. त्यांनी गरजूंसाठी पोळीभाजी आणि औषधांची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात लॉकडाउन असल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. पण ह्या महामारीचा नायनाट करण्यासाठी ते सहन करायलाच पाहिजे हे जरी खरं असलं तरी काही गोष्टी मदत म्हणून करता येऊ शकतात आणि थोडी सुसह्यता येऊ शकते. त्यासाठी कोथरूड मतदारसंघातील गरजू नागरिकांच्या मदतीसाठी दोन सेवा आत्ता सुरू करत आहोत. ज्या मी, माझे सहकारी, पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी ह्यांच्या साहाय्याने जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत चालू ठेवीन, असे पाटील म्हणाले.

पाच रुपयांत घरपोच पोळीभाजी –

गरजू नागरिकांसाठी पाच रूपयांत घरपोच पोळीभाजीची सोय पाटील यांनी मतदारसंघात केली आहे. यासाठी 8262879683 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करावा लागेल. सकाळी दहा वाजेपर्यंत मागणी नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक वरील व्हॉट्सअप करावं. दुपारी एक वाजेपर्यंत पोळीभाजी तुमच्या घरी पोहच होईल. तसेच सायंकाळी सहा वाजेपर्यंत रात्रीच्या जेवणाची मागणी घेण्यात येत आहे. रात्री ९ वाजेपर्यंत घरपोच देता येईल.

घरपोच औषधं आणि २५ टक्क्यांची सूट –
ज्या नागरिकांना औषधांची गरज आहे आणि डॉक्टरांनी नियमित घ्यायला सांगितली आहेत, अश्या नागरिकांना 25% सवलतीच्या दरात घरपोच प्रिस्क्रिप्शन नुसार औषधं पोहच केली जाणार आहे. या सुविधेसाठी या 9922037062 व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधा…