राज्यातील करोनाच्या हॉटस्पॉटपैकी एक असणाऱ्या पुण्यातील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. पुणे शहरात दिवसभरात २०२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका ४६ वर्षीय तृतीयपंथीयाचा समावेश आहे. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३२९५ झाली आहे. तर मृतांची संख्या १८५ झाली आहे. दरम्यान ६८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत पुण्यात १६९८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आज

दुसरीकडे महाराष्ट्रात शनिवारी १६०६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या आज ३० हजार ७६ इतकी झाली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शनिवारी राज्यात ५२४ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ७ हजार ८८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्यात २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबईत ८८४ नवे करोना रुग्ण
मुंबईत ८८४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या आता १८ हजार ३९६ इतकी झाली आहे. आज २३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ६९६ झाली आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.