सकाळी आणि दुपारी भाजीविक्रीला परवानगी

पुणे : शहरातील मंडईत भाजी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे आणि भाजी खरेदी दरम्यान सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळले जात नसल्याचे सातत्याने पुढे आल्यामुळे आता दिवसातून के वळ पाच तासच भाजी विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे. भाजी मंडई आणि बाजार परिसरामध्ये एका वेळी फक्त पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.  महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्याबाबतचे आदेश काढले असून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना महापालिके चे संबंधित अधिकारी, पोलीस आणि शासकीय यंत्रणांना दिले आहेत.

शहरात उद्भवलेल्या करोना संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी शहरात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रथम शहरातील भाजी मंडई, बाजार बंद करण्यात आले होते. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊ नये, यासाठी मंडई सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र पदपथांवर, रस्त्यांवर, सोसायटय़ांच्या आवारात सर्रास भाजी विक्री सुरू झाल्याचे चित्र पुढे येण्यास सुरुवात झाली. नागरिकांकडूनही भाजी विक्रीसाठी गर्दी करण्यात येत असल्यामुळे आणि सामाजिक अंतराचे निर्बंध पाळण्यात येत नसल्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी ही बाब महापालिके च्या निदर्शनास आणून दिली होती. विशेष म्हणजे टाळेबंदी आणि पोलिसांकडून कडक निर्बंध लादूनही टाळेबंदीच्या भागात नागरिकांकडून भाजी खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे अखेर शहराच्या सर्वच भागातील भाजी विक्रीवर मर्यादा आणण्याचा निर्णय महापालिके ने घेतला आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी त्याबाबतचे आदेश काढले.

शहरातील अधिकृत फे रीवाला, शेतकरी आठवडे बाजार यांना त्यांच्याकडील भाजीपाला विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बंदी असतानाही भाजी विक्री करताना आढळल्यास त्यावर गुन्हा दाखल होणार असून शहरात सकाळ आणि दुपार अशा दोन टप्प्यात के वळ पाच तास भाजी विक्रीसाठी या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे. सकाळी अकरा ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच अशा वेळेतच भाजीविक्री होईल. सोसायटय़ांच्या आवारात येणाऱ्या शेतकरी समूह किं वा शेतकरी गटालाही याच वेळेत भाजी विक्री करता येईल, अशी माहिती आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

भाजी मंडई, बाजार परिसरात एकाच वेळी फक्त पाच व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे.

अनधिकृत पद्धत वापरल्यास कारवाई

शहराच्या काही भागात महापालिके ने टाळेबंदी के ली आहे. मात्र त्यानंतरही या भागात अनधिकृत पद्धतीने अनेक भाजी विक्रे त्यांकडून भाजी विक्री होत आहेत. ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी महापालिके ने त्या-त्या भागातील महापालिका सहायक आयुक्तांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती के ली आहे. अनधिकृत बाजार, भाजी विक्रे त्यांवर कारवाई करण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे.