23 November 2020

News Flash

Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देणार विरोधकांना उत्तर, उद्या पुणे दौऱ्यावर

उद्धव ठाकरे घेणार पुण्यातील परिस्थितीचा आढावा

संग्रहित छायाचित्र

करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्याचा दौरा करणार आहेत. पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुख्यमंत्री पुण्याचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. सोबतच पुण्यावर अन्याय केली जात असल्याची टीकाही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गुरुवार सकाळी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते करोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीत पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात करोना संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली जाईल. बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच विभागीतय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होतील.

सोमवारी पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार पुण्यावर अन्याय करत असल्याची टीका केली होती. “हे सरकार मुंबईकडे जितकं लक्ष देतं तितकं पुण्याकडे देत नाही. पुण्यावर अन्याय केला जात आहे. पुण्यात क्वारंटाइन सेंटर, आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे. पण पुणे, पिंपरी पालिकेला एकाही नव्या पैशांचं अनुदान राज्य सरकारने दिलेलं नाही. वेळेत व्यवस्था निर्माण केली तर लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागेल,” असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील मुख्यमंत्र्यांनी थोडं फिरायला हवं असा सल्ला दिला होता. “धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतच आहे. तसंच निर्णय घेताना ते सर्व सहकाऱ्यांनाही विश्वासात घेतात. त्यांनी एका ठिकाणी बसून काम करण्यात काही वाद नाही. परंतु त्यांनी थोडं फिरायलाही हवं,” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 1:05 pm

Web Title: coronavirus maharashtra cm uddhav thackeray to visit pune sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 पुण्यातील सदनिका खरेदी-विक्रीत ५० टक्क्यांची घट
2 Coronavirus : शहरात दिलासादायक स्थिती
3 करोना संकटामुळे यंदा राखी विक्री बेताचीच
Just Now!
X