30 September 2020

News Flash

Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये सहा नवे पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण संख्या १२१ वर

आत्तापर्यंत ५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी सहा जण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत ५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून यापैकी एकाला आज घरी सोडण्यात आले आहे. शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या १२१ वर पोहचली आहे. त्यामुळं नागरिकांनी आणखी जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आजं आढळलेल्या सहा जणांमध्ये  दोन तरुण, एका मुलीसह तीन महिलांचा समावेश आहे. ज्यांच वय १४ वर्षापुढील असून एकाचे वय ७१  आहे.  हे सर्व करोना बाधित रुग्ण पिंपळे सौदागर, चिंचवड, जुनी सांगवी, मोशी या परिसरातील आहेत. तर करोनामुक्त झालेला व्यक्ती पुण्यातील वडगाव शेरी येथील असून त्याच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या दोन्ही  टेस्ट निगेटिव्ह आल्याने  त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, आज मध्यरात्रीपासून शहरातील पिंपळे सौदागर येथील (पकवान स्विटस – कुणाल आयकॉन रोड – ओम दत्तराज मंदिर – रोज वुड सोसायटी- सोमनाथ स्नॅक्स सेंटर ओम चैतन्य दुध डेअरी – एम.एस.ई.बी. ऑफिस – पकवान स्विटस ) व इंदिरानगर, चिंचवड येथील ( महिंद्रा टु व्हलीर्स शोरुम -सरस्वती को.ऑप.बॅक सायन्स पार्क – वीएसाएनएल कॉटर्स – महिंद्रा टु व्हलीर्स शोरुम ) येथील परिसर त्याचबरोबर डबल ट्री हॉटेल – कॉर्पोरेशन बॅक ए.एम.एम. एस.आयबीएमआर कॉलेज – तेजस एन्टरप्रायजेस परिसर सील करण्यात येणार असून पुढील आदेशापर्यंत ते सील राहणार आहेत. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2020 9:06 pm

Web Title: coronavirus new six corona patient found in pimpri chinchwad the total number is 121 msr 87 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: लष्कराकडून पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मानवंदना
2 पुण्यातील करोनाग्रस्तांवर होणार ‘प्लाझ्मा थेरपी’; ‘आयसीएमआर’कडून परवानगी
3 Coronavirus : मुंबईत उभं राहतंय १ हजार बेडचं करोना हॉस्पिटल
Just Now!
X