पुणे शहरातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशानसन आता अधिकच सतर्क झाले आहे. अगोदरच शहरातील 22 भाग सील करण्यात आलेले असताना आता आणखी काही भाग सील करण्याचे आदेश पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.

आता नव्याने सील करण्यात येणाऱ्या भागांमध्ये वानवडी पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन, मुंढवा पोलीस स्टेशन व कोंढवा पोलीस स्टेशनच्या ह्द्दतील परिसराचा समावेश आहे.

वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील विकासनगर, सय्यदनगर – रामटेकडी – चिंतामणीनगर – वॉर्ड नं. २४ – हांडेवाडी रोड – काळेपडळ
रेल्वे गेट ते दुर्गामाता मंदीर ते म्हसोबा मंदीर – ड्रिम्स आकृती सोसायटी – ढेरे मार्केट ,चिंतामणी नगर हांडेवाडी, प्रभाग क्र.२६ व २८

हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील सोलापूर रोड ज्योती हॉटेलपासून मिरेकर वस्ती कॅनालचे उजवीकडील भाग – एच.पी. पेट्रोल पंप
महात्मा फुले वसाहत संपूर्ण रेल्वे लाईनकडील इंदीरानगर झोपडपट्टी- डीपी रोड, म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा ओढ्याकडील संपूर्ण परिसर

मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील घोरपड़ी गांव – बी.टी. कवड़े रोड – विकासनगर – बालाजीनगर – श्रावस्ती नगर प्रभाग क्र. ०२ व  कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील  एन.आय.बी.एम रोड प्रभाग क्र.२६ तसेच  संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर, संपूर्ण कोंढवा बुद्रुक परिसर, साईनगर कोंढवा प्रभाग क्र.२७ व येवलेवाडी संपूर्ण परिसरासह  कृष्णानगर व महंमदवाडी संपूर्ण परिसरांचा समावेश आहे.

या अगोदर शहरातील आणखी २२ भागात कठोर निर्बंध घालण्याबाबत महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या प्रस्तावानुसार संबंधित र्निबधाचे आदेश मंगळवारी रात्री सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी जारी केले होते. या भागातील जीवनावश्यक वस्तू, किराणा मालाची विक्रीची दुकाने सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत खुली राहणार आहेत.

दूध, भाजीपाला, किराणा माल, फळे यांची विक्री करणारी दुकाने सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत खुली राहतील. नागरिकांनी सामाजिक अंतर राखून सर्व व्यवहार करावेत. दुपारी १२ नंतर दुकाने बंद ठेवण्यात येतील. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन डॉ. शिसवे यांनी केले आहे.