News Flash

Coronavirus  : पुण्यात चार, पिंपरीत एका रुग्णाचा मृत्यू

६७ नवे रुग्ण, ३७ रुग्ण बरे होऊन घरी

Coronavirus  : पुण्यात चार, पिंपरीत एका रुग्णाचा मृत्यू
(संग्रहित छायाचित्र)

६७ नवे रुग्ण, ३७ रुग्ण बरे होऊन घरी

पुणे : बुधवारी पुणे शहरात चार तर पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील मृतांची संख्या ६२ झाली आहे. पुणे, पिंपरी आणि परिसरात बुधवारी ६७ रुग्णांना नव्याने करोनाची लागण झाली. त्यामुळे परिसरातील रुग्णसंख्या ८८० झाली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाने बुधवारी रात्री याबाबत माहिती दिली. पिंपरीत नव्याने लागण झालेल्या रुग्णांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पुणे शहरात ६४ नव्या रुग्णांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. पिंपरीतील ४० वर्षीय महिलेचा करोनाने मृत्यू झाला. तिला अस्थमाची पाश्र्वभूमी होती. तीन रुग्ण ससून रुग्णालयात तर एक रुग्ण खासगी रुग्णालयात दगावला असून या सर्वाना इतर गुंतागुंतीच्या आजारांची पाश्र्वभूमी होती.

दरम्यान पुण्यातून ३५ तर पिंपरी-चिंचवडमधून दोन नव्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 3:33 am

Web Title: coronavirus outbreak four more deaths in pune due to coronavirus
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नालेसफाईच्या कामांना वेग
2 एका चिमुकल्यासाठी पुण्यातून बेळगावला संजीवनी!
3  ‘झूम’ला पर्याय विकसित करण्यासाठी सरकारकडून ‘इनोव्हेशन चॅलेंज’
Just Now!
X