15 January 2021

News Flash

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधितांचा आकडा वाढला; ६ महिन्यांच्या चिमुकलीलाही करोनाची बाधा

करोनाची शहरातील संख्या १६७ वर पोहचली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहरात आज सर्वाधिक १३ जण करोना बाधित रुग्ण आढळले असून यात एका ६ महिन्याच्या चिमुकलीचाही समावेश आहे. यानंतर शहरातील करोना बाधितांचा आकडा १६७ वर पोहचला असून करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर आजपर्यंत ७७ जणांना करोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्येक वयोगटातील नागरिक, तरुण, जेष्ठ नागरिक आणि चिमुकल्यानांदेखील करोनाची बाधा झालेली आहे. आजदेखील एका सहा महिन्यांच्या चिमुकली ला करोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झाले आहे. दरम्यान शहराच्या हद्दीबाहेरील करोनाबाधितांवर महानगर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज करोनाबाधित आढळलेले रुग्ण हे रुपीनगर, ताम्हाने वस्ती, काळेवाडी, थेरगाव, चऱ्होली, पुण्यातील नानापेठ आणि खडकी येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरातील काही परिसर सील करण्यात येणार

गुरुविहार (गुरुविहार कॉलनीगार्डन–महादेव मंदिर–पुणे नाशिक–हायवे–एस.बी.आय. एटीएम–‘ई’प्रभागक्षेत्रिय कार्यालय–भोसरी रोलरकेटर रिंग- गुरुविहार कॉलनी गार्डन) लांडगेनगर, भोसरी (ऑक्वा गणेश कॉर्नर– स्पेरोनी इंडिया प्रा.लि.–पुणे नाशिक हायवे–हॉटेल क्लाऊड ९–स्वस्तीक ज्वेलर्स–ऑक्वा गणेश सोसायटी-ऑक्वा गणेश कॉर्नर) तापकीर चौक, काळेवाडी (हॉटेल गुरुदत्त–एस.बी.आय.एटीएम–शिवसेना कार्यालयासमोर–हनुमान सुपर मार्केट–ओंकार लॅमिनेटस्–बेबीज इंग्लिश स्कुल–तुळजाभवानी मंदिर– बेंगलोर अय्यंगार बेकरी–हॉटेलगुरुदत्त) दत्तनगर, थेरगाव (पिंक लिली सोसायटी-पवना नदी-गंगा आशियाना मागील मोकळीजागा–गंगा आशियाना ‘आय’ बिल्डींग-गंगा आशियाना ‘के’ बिल्डींग-पिंक लिलीसोसायटी), कस्पटेवस्ती, वाकड. (सोनिगीरा केसरबिल्डींग ‘७’–ऍलियन्स हॉटेल समोर–कस्पटे वस्ती रोड–छत्रपती रोड–पंजाबनॅशनल बँक– सोनिगीरा सोसायटी रोड-सोनिगीरा केसर बिल्डींग ‘७’) परिसर आज मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येणार आहेत. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात आली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 9:33 pm

Web Title: coronavirus patient numbers increases pimpri chinchwad 6 months old found corona positive jud 87 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 चिंताजनक : पुणे शहरात दिवसभरात १३५ नवे करोनाबाधित रुग्ण
2 खंडेरायाच्या जेजुरीत आढळला करोनाचा पहिला रुग्ण
3 पती-पत्नीचा वाद, ५ महिन्याच्या चिमुकलीचा जन्मदात्यानेच केला खून
Just Now!
X