26 February 2021

News Flash

Coronavirus : करोनामुक्तीचे प्रमाण पुण्यात सर्वाधिक

पुण्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

पुण्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ; शहरातील १ लाख ४८ हजार ८७० रुग्ण करोनामुक्त

पुणे : रुग्णांचे प्रमाण झपाटय़ाने वाढत असताना मागील सहा महिन्यांत देशातील करोना संसर्गाचे प्रमुख के ंद्र अशी नकोशी ओळख पुणे शहराला प्राप्त झाली होती, मात्र आता पुण्यात करोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर देशात सर्वाधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. रविवापर्यंत पुणे शहरातील तब्बल १ लाख ४८ हजार ८७० रुग्ण करोनातून संपूर्ण बरे झाले आहेत.

करोनाचे महाराष्ट्रातील सर्वात पहिले रुग्ण नऊ मार्च या दिवशी पुण्यात आढळले. त्यामुळे पुणे शहराने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर सप्टेंबरअखेपर्यंत पुणे शहरातील करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती. त्यामुळे देशातील करोना संसर्गाचे प्रमुख के ंद्र म्हणून पुणे शहराकडे देशातील सर्व राज्यांच्या नजरा पुण्याकडे रोखलेल्या होत्या. विशेष बाब म्हणजे मुंबईसारख्या अवाढव्य शहरातील रुग्णवाढ कमी झाल्यानंतरही पुण्याची रुग्णवाढ कमी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे पुणे शहर हे देशातील करोना साथीचे एक प्रमुख के ंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र, ऑक्टोबर महिन्यात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. दैनंदिन मृत्यूही कमी झाले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे.

रविवारी पुणे शहरातील करोना रुग्ण बरे होण्याचा दर ९३.२१ टक्के  एवढा नोंदवण्यात आला. देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये हा दर ९० टक्यांच्या जवळपास आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर ९०.७६ टक्के  आहे. बंगळुरु येथे ८१.१७ टक्के  रुग्ण बरे झाले आहेत. कोलकाता शहरात रुग्ण बरे होण्याचा दर ८७.२२ टक्के  तर अहमदाबाद शहरात तो ८६.९९ टक्के  एवढा आहे.

पुणे शहरातील रुग्ण बरे होण्याचा दर

तारीख                रुग्ण बरे होण्याचा दर

२३ जून                ६०.३९  टक्के

२३ जुलै               ५८.७९ टक्के

९ ऑगस्ट             ७३.७० टक्के

२६ ऑगस्ट            ८०.४८ टक्के

२१ सप्टेंबर            ८४.५५ टक्के

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 1:04 am

Web Title: coronavirus pune recovery rate highest in country zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 खासगी वापराच्या वाहनांची खरेदी कायम
2 उद्योगनगरीत दिवाळी बोनसबाबत संमिश्र स्थिती
3 राज्याच्या निम्म्याहून अधिक भागांतून पाऊस माघारी
Just Now!
X