News Flash

“करोना लस यशस्वी झाल्यानंतर सरकारकडे…”; सिरम इन्स्टिट्यूटची महत्त्वाची माहिती

सिरम इन्सिट्यूटकडून करोना लस वाटपासंबंधी महत्त्वाची माहिती

सिरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने भारतात करोना लस खासगी संस्थांच्या मार्फत न देता सरकारच्या माध्यमातून त्यांचं वाटप करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. सिरम इन्स्टिट्यूट लसनिर्मती करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जातो. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्विट करत पारसी समाजासाठी गरजेपेक्षा जास्त लस ठेवण्यासंबंधी ट्विट केल्यानंतर कंपनीकडून ही माहिती देण्यात आली आहे. हिंदुस्तान टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की, “हे दोन पारसींमधील मैत्रीपूर्ण संभाषण होतं. एकदा लस तयार झाली की सर्वांसाठी ती उपलब्ध असेल. पण त्यासंबंधी आता बोलणं खूप घाईचं ठरेल”. ऑक्सफर्ड आणि त्यांचे पार्टनर AstraZeneca यांच्याकडून करोना लसची निर्मिती करण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे.

लस वाटपासंबंधी बोलताना कंपनीने सांगितलं आहे की, लोकांना बाजारातून ही लस खरेदी करावी लागणार नाही. सरकारमार्फेत याचं वाटप केलं जाणार आहे. “एकदा लस चाचणी पूर्ण आणि यशस्वी झाली की तर सरकारमार्फेत तिचं वाटप केलं जाईल. जेणेकरुन लोकांना ती थेट खरेदी करावी लागणार नाही,” असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

रविवारी अदर पूनावाला यांनी उद्योजक रॉनी स्क्रूवाला यांनी पारसींसाठी विशेष कोटा ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ज्यावर अदर पूनावाला यांनी उत्तर देताना हो ठेवणार असल्याचं सांगत आम्ही एका दिवसात एवढ्या लसींची निर्मिती करू की संपूर्ण जगातील पारसी समुदायातील लोकं सुरक्षित होतील असं म्हटलं होतं. हे अत्यंत हलकं फुलकं संभाषण होतं.

दरम्यान सिरमने ऑगस्ट महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी आणण राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याने येथेच चाचणी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. जेणेकरुन लस किती प्रभावी आहे हे तपासता येईल. याआधी सिरमने ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत चार ते पाच हजार जणांना चाचणीसाठी करोना लस दिलेली असेल अशी माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 5:19 pm

Web Title: coronavirus serum institute says once successful vaccine doses will be distributed by government sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये आईनेच केला चार वर्षीय चिमुकलीचा खून
2 सरकारच्या नाकर्तेपणामुळं मराठा समाजाच्या भरतीला अप्रत्यक्ष स्थगिती – विनायक मेटे
3 खासगी रुग्णालयांचे बिल सरकारी दरानुसार आहे की नाही याची तपासणार होणार
Just Now!
X