करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने ‘शरद भोजन योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे पुण्यातील निराधार दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असणारे निराधार व्यक्ती व ज्येष्ठ नागरीक यांना दोन वेळेचे अन्न पुरविण्याचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील गरजू व्यक्तींना यामुळे दोन वेळेचे पोटभर जेवण मिळणे शक्य होणार आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन थाळीच्या धर्तीवर ही योजना असल्याचे पुणे जिल्हा परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या योजनेमध्ये निराधार दिव्यांग/ व्यक्तीच्या गावातील अंगणवाडीतील सेविका ही त्या व्यक्तीस दररोज दोन वेळेचे जेवण तयार करून देईल. ग्रामपंचायतमधील अंगणवाडी मदतनीस यांच्यामार्फत जेवणाची व्यवस्था करणे आणि त्याला अन्न पुरवठा करणे याकरिता व्यक्तीनिहाय ५० रूपये याप्रमाणे थाळीचा दर ठरवण्यात आला आला आहे. दोन वेळेच्या जेवणाकरीता अंगणवाडी मदतनीस अशा निराधार दिव्यांगांना जेवण तयार करून पुरविणे व या अनुषंगाने अंगणवाडी मदतनीस यांच्या वैयक्तिक खात्यावर ५० रूपयाप्रमाणे दोन वेळचे १०० रूपये प्रतिदिन अनुदान जमा करण्यात येणार आहे.

Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
E bus service started on behalf of State Transport Corporation during Chaitrotsav nashik
नाशिक-सप्तश्रृंग गड ई बससेवा
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

मदतनीस यांना पुणे जिल्हा परिषदेकडून प्रतिथाळी ५० रूपयांचं मानधन मिळणार आहे. पण, निराधार दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असणारे निराधार व्यक्ती व ज्येष्ठ नागरीक यांना प्रतिथाळी किती रूपये मोजावे लागणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे त्यांना मोफत जेवण मिळणार की काही पैसे मोजावे लागणार हे अलबेल आहे.