करोनामुळे पुण्यातील परिस्थिती अधिकच बिघडत आहे. आज दिवसभरात पुण्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याबरोबरच पुण्यातील मृतांचा आकडा आता 44 वर पोहचला आहे.

शहरातील पर्वती भागातील दोघांचा, भवानी  पेठेतील एकाचा, शिवाजी नगरमधील एकाचा व गोखले नगर मधील एकाचा व अन्य एकाचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मंगळवारी 46 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे छावनी आणि पुणे ग्रामीण परिसरातील रुग्णांची संख्या 365 झाली होती. मंगळवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला होता त्यामुळे मृतांचा आकडा 38 वर पोहोचला होता. त्यानंतर आज आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने मृतांची ताजी आकडेवारी 42 झाली आहे.

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या आता २८०१ झाली आहे. कारण या रुग्णांमध्ये ११७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ११७ मधले १०० रुग्ण मुंबई पुण्यातले आहेत. ११७ पैकी ६६ रुग्ण हे मुंबईतले तर ४४ रुग्ण पुण्यातले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. देशभरातील करोनाग्रस्तांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. अशात आता आज ११७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २८०१ इतकी झाली आहे.