27 February 2021

News Flash

Coronavirus: शस्त्रक्रिया केलेला रुग्ण निघाला करोनाबाधित; डॉक्टरांसह ९२ जण क्वारंटाइन

अपघातात जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे ४२ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यांपैकी सर्व ४२ डॉक्टरांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर उर्वरित ५० लोकांचा चाचणी अहवाल उद्या येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

३१ मार्चला अपघातग्रस्त व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरने केली होती. त्यानंतर त्या रुग्णाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. तातडीने त्याचा चाचणी अहवाल पाठवण्यात आला तेव्हा तो करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे संबंधित डॉक्टर आणि संपर्कात आलेल्या इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून आत्तापर्यंत २१ रुग्ण आढळले आहेत. यांपैकी १२ जणांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. अशातच ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

३१ मार्चला रिक्षा चालक असलेल्या व्यक्तीचा कासारवाडी येथे अपघात झाला होता. त्याच्या पोटाला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्या व्यक्तीला तातडीने एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जाण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. परंतु, त्याच्या पोटाला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. त्याप्रमाणे शस्त्रक्रिया झाली. मात्र, त्यानंतर रुग्णामध्ये ताप, सर्दी आणि खोकला याची लक्षणे आढळली. तातडीने त्याचे रिपोर्ट हे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आले. तेव्हा, त्यामध्ये हा रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ९२ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं.

यांपैकी सर्व ४२ डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर उर्वरित ५० जणांचे चाचणी अहवाल उद्या येणार असल्याची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 2:25 pm

Web Title: coronavirus surgery done on patient but he has corona infection quarantine 90 people with doctors aau 85 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : विद्यापीठाचे ६० हजार विद्यार्थी संचारबंदीत नागरिकांच्या मदतीला
2 Coronavirus : पोलिसांच्या सुरक्षेसाठी पुण्यात देशातली पहिली सॅनिटायझेशन व्हॅन
3 Coronavirus : होम कॉरंटाईनचा आदेश डावलून पुण्यात फिरणारे आठ परदेशी ताब्यात
Just Now!
X