महाराष्ट्रात करोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत पुणे महापालिकेने करार केला असून विलगीकरणाचे 500 आणि अतिदक्षताचे 30 बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, जगभरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याकडे देखील रुग्ण वाढत असल्याने, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पुणे महापालिका आणि सिम्बॉयोसिस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. लवळे येथील सिम्बॉयोसिस हॉस्पिटल आता महापालिका कोरोना उपचारांसाठी वापरणार आहे. तसेच आपल्याला करोनावर नियंत्रण मिळवायचे असेल  तर नागरिकांनी घरी बसावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.