पुणे शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काल अखेर पर्यंत शहरात 772 बाधित रुग्ण आढळले असून त्यामध्ये भवानी पेठेतील 171 रुग्ण आढळले आहे. यामुळे ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.

पुणे शहरात काल दिवसभरात करोना विषाणूंचे 64 रुग्ण नव्याने आढळले असून आता रुग्णांची संख्या 772 झाली आहे. तर काल 4 रुग्णाचा बळी गेला असून एकूण बळींची संख्या 56 झाली आहे. 14 दिवसानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या 122 रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

याच दरम्यान पुणे शहरातील मध्य पुण्याचा भाग करोना विषाणूंचा बाधित म्हणून पुढे आला आहे. भवानी पेठ 171, कसबा विश्राम बाग 111 आणि ढोले पाटील 110 या तीन भागात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, प्रशासनामार्फत हे भाग सील करण्यात आले आहे. या भागासह शहरातील रुग्ण संख्या कमी करण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना प्रशासनमार्फत करण्यात येत आहेत.