News Flash

Coronavirus : पुण्यात दोन महिलांचा मृत्यू, शहारातील मृतांचा आकडा 31 वर

ससून रुग्णालयात सुरू होते उपचार

संग्रहित छायाचित्र

जगभरासह देशात जीवघेण्या करोना व्हायरसचे थैमान सुरू आहे. राज्यभरात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मुंबई व पुणे शहरातील रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूच्या आकड्यातही वाढ होत आहे. आज सकाळपासून पुण्यात करोनाने दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील संगमवाडी परिसरातील एका 58 वर्षीय महिलेसह सोमवार पेठेतील एका 56 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिलांना अन्य आजारांनी देखील ग्रासले होते असे देखील सांगण्यात आले आहे. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पुण्यात आतापर्यंत करोनामुळे 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या 31 रुग्णांपैकी आज 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज 134 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या 1895 वर पोहचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 1:52 pm

Web Title: coronavirus two women die in pune msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कर्तव्यनिष्ठ खाकी; मुलगा मृत्यूशी झुंज देत असताना बाप बजावतोय पोलिसाचं कर्तव्य
2 पुण्यात व्हॉट्स अ‍ॅप हॅक झाल्याच्या तक्रारींनंतर पोलिसांकडून अर्लट जारी
3 रेल्वेच्या पुणे विभागातून देशभरात विक्रमी संख्येने मालगाडय़ांची वाहतूक
Just Now!
X