पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक : निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी गुरुवारी (३ डिसेंबर) सुरू होणार आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकु ल येथे ही मतमोजणी होणार आहे. विभागाच्या पाचही जिल्ह्यांतील मतपत्रिका एकत्र करून वैध मतांचे गठ्ठे करण्याची प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्यक्ष मोजणीला रात्री नऊपासून सुरुवात होणार आहे. परिणामी निकालाचा कल गुरुवारी समजू शकणार आहे, तर निकाल शुक्रवारी (४ डिसेंबर) जाहीर होणार आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये उच्चांकी मतदान झाले आहे. परिणामी मतमोजणीसाठी ३६ तासांपेक्षा अधिक काळ लागणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. प्रत्यक्ष निकाल शुक्रवारीच हाती येण्याची दाट शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील मतपत्रिका बालेवाडी येथे आणण्यात आल्या असून सुरुवातीला मतपत्रिका मतपेट्यांमधून काढून एकत्र के ल्या जाणार आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी ६२ उमेदवार असल्याने मतपत्रिका मोठ्या आकाराची आहे. त्यामुळे मतपत्रिका एकत्र करण्याची प्रक्रिया करण्यास विलंब लागणार आहे. मतपत्रिका एकत्र के ल्यानंतर वैध-अवैध मतपत्रिका वेगवेगळ्या के ल्या जातील. त्यानंतर वैध मतपत्रिकांचे गठ्ठे बनवून ते गठ्ठे प्रत्येक टेबलवर दिले जाणार आहेत. मतमोजणीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी अनुक्रमे ११२ आणि ४२ टेबल ठेवण्यात आले आहेत. या सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास रात्रीचे नऊ वाजतील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.

मतमोजणी के ंद्रावर पदवीधर आणि शिक्षकसाठी अनुक्रमे १८ आणि सहा खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत सात टेबल असतील. पदवीधरसाठी १२६ पर्यवेक्षक, २५२ सहायक आणि १२६ शिपायांची नेमणूक के ली आहे. शिक्षकसाठी ४२ पर्यवेक्षक, ८४ सहायक आणि ४२ शिपायांची नेमणूक केली आहे.

मतमोजणी प्रक्रिया अशी असेल

  •  उमेदवारांना निवडून येण्यासाठी किमान आवश्यक कोटा ठरवण्यात येतो.
  •  एकू ण वैध मतांची संख्या, त्या संख्येच्या निम्मी मते अधिक एक करून येणारी संख्या ही कोटा म्हणून निश्चित.
  •  निश्चित कोट्याएवढी प्रथम पसंतीची मते मिळाल्यास संबंधित उमेदवार विजयी घोषित होईल.
  • आवश्यक कोट्याएवढी मते कोणालाच न मिळाल्यास कमी मते मिळालेला उमेदवार बाद होऊन दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील.
  •  ही प्रक्रिया उमेदवार निवडून येईपर्यंत के ली जाईल.

प्रत्येकाची तपासणी

करोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर शरीर तापमान मोजणी, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण अशी तपासणी के ली जाणार आहे. करोनाविषयक सुरक्षेच्या नियमांचे पालन होते किं वा कसे?  हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती के ली असून संबंधित अधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहून आढावा घेण्याच्या सूचना आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिल्या आहेत.