20 February 2019

News Flash

पुण्यात ‘कपल गार्डन’च्या मागणीला जोर

'राईट टू लव्ह' संघटनेची मागणी

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे हे शिक्षणाचे तसेच आयटीचेही हब असल्याने या ठिकाणी तरुणांची संख्या मोठी आहे. पुण्याचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने पुणे शहराच्या हद्दीत सध्या ११० हून अधिक गार्डन आहेत. यामध्ये कपल गार्डनही असावे अशी मागणी पुण्यातील ‘राईट टू लव्ह’ संघटनेने केली आहे. प्रेम करणे हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे, त्याला तो मिळायलाच हवा यासाठी संघटना काम करते. संघटनेच्या वर्धापनदिनाच्या तसेच ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ही मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे.

बदलत्या युगात तरुण-तरुणी बिनधास्तपणे प्रेम करतात. मात्र संस्कृतीच्या नावाखाली अनेक व्यक्ती आणि संघटनांकडून या गोष्टीला विरोध होताना दिसतो. त्यामुळे प्रेमाचा आणि ते करणाऱ्याचा सन्मान व्हायला हवा. शहरात सर्वच प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. मात्र याठिकाणी प्रेम करणाऱ्यांसाठी सुरक्षित ठिकाणे नाहीत. यामुळे ही जोडपी शहराच्या ठिकठिकाणी बसलेली दिसतात. पण त्याबाबतही संस्कृती रक्षकांकडून विरोध होताना दिसतो. परंतु प्रेम करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. तो व्यक्त करण्यासाठी विशिष्ट ठिकाणाची आवश्यकता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

याबाबतचे पत्र संघटनेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिले असून येत्या काळात असे गार्डन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संस्कृती रक्षक आणि पोलिसांकडून प्रेमीयुगुलांवर करण्यात येणाऱी कारवाई हा अन्याय आहे. तो अन्याय दूर करण्याची जबाबदारी पालिकेने घ्यावी असेही आवाहन संघटनेने पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात केले आहे. प्रेमाची संस्कृती जपण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यायला हवा अशी मागणी केली आहे.

First Published on February 13, 2018 7:37 pm

Web Title: couple garden in pune demand from right to love valentine day