खुनाच्या प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या आपल्या मुलांची जामिनावर सुटका करण्यासाठी बनावट जामीनपत्रे तयार केल्याप्रकरणी माजी नगरसेवक तानाजी निम्हण व न्यायालयातील लिपिकास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या लिपिकाने खुनाच्या गुन्ह्य़ातील अन्य एका व्यक्तीला अशाच पद्धतीने बनावट जामीन तयार करून दिल्याचे तपासात समोर आले आहे.
दीपक ज्ञानोबा राऊत (वय ५१, रा. कसबा पेठ) असे या लिपिकाचे नाव आहे. प्रतीक निम्हण या तरुणाच्या खुनाच्या गुन्ह्य़ात चतु:शृंगी पोलिसांनी तानाजी निम्हण याची मुले तुषार व चेतन यांना अटक केली होती. त्यांना जामीन मिळत नसल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून ते येरवडा कारागृहातच होते. त्यांना जामीन मिळावा म्हणून निम्हण याच्या सांगण्यावरून राऊत याने तुषार व चेतन यांचे बनावट जामीनपत्र व बाँड तयार केले. त्या बनावट कागदपत्रावरून २२ नोव्हेंबरला ते दोघे कारागृहातून बाहेर आले. यासाठी राऊत याने पंधरा लाख रुपये घेतले होते. ही गोष्ट समजल्यानंतर या गुन्ह्य़ात पोलिसांनी राऊत आणि निम्हण यांना अटक केली आहे.
या दोघांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्य़ाचे गांभीर्य पाहता सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. राऊत याने आणखी राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्य़ातील आरोपीला बनावट जामीन देऊन त्याची कारागृहातून सुटका केली आहे. अशा पद्धतीने त्याने आणखी कोणाला बनावट जामीन दिला आहे, याचा तपास करायचा आहे. या गोष्टीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. त्याला निम्हण यांचे वकील अ‍ॅड. बिपीन पाटोळे आणि राऊतचे वकील बी. ए. अलुर यांनी विरोध केला. न्यायालयाने आरोपींना २१ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
fraud in recruitment exam of Mahanirmiti case against four including two candidates
महानिर्मितीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार, दोन उमेदवारांसह चौघांविरोधात गुन्हा
man attacked wife Bhiwandi
ठाणे : जेवण गरम करून दिले नाही म्हणून एका व्यक्तीने पत्नीच्या डोक्यात पाट मारला, महिलेची प्रकृती गंभीर