रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के

पुणे : करोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ११० दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याच्या कालावधीमध्ये वाढ झाली असतानाच उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के  एवढे झाले आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीने के लेल्या अहवालामध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शहरातील करोना चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. रुग्ण सापडण्याचे प्रमाण २३ टक्यांवरून १७ टक्क्यांपर्यंत खाली आहे.

जुलै महिन्यानंतर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढण्यास सुरुवात झाली. जुलै अखेपर्यंत २२ दिवसांवर असलेला कालावधी ७ ऑगस्टपर्यंत ३२ दिवसांवर तर दहा ऑगस्ट रोजी ३५ दिवसांवर पोहोचला होता. २० ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ४३ दिवसांवर पोहोचला होता. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ११० दिवसांवर पोहोचला असल्याची माहिती महापालिके च्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी ऑक्टोबर महिनाअखेपर्यंत आणखी वाढेल, असा अंदाज आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या घटलेला मृत्युदर, बाधित रुग्णांचे बरे होण्याचे लक्षणीय प्रमाण आणि रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वाढलेला कालावधी यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांबरोबरच अन्य उपाययोजनांचीही अंमलबजावणी के ली जात आहे. करोना संशयित रुग्णांचे तातडीने निदान होत असल्यामुळे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही वाढत आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

करोनाबाधितांची संख्या

मार्च महिन्यापासून शहरात सहा ऑक्टोबपर्यंत ६ लाख ५३ हजार ७७३ चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये एकू ण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ५० हजार ४३३ एवढी आहे. त्यामध्ये १४ हजार १८४ रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.१० टक्के  असून १ लाख ३२ हजार ५४० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.