04 July 2020

News Flash

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे कोविड पतपुरवठा साहाय्य

तिमाहीत एक लाख लाभार्थीना २७८९ कोटी रुपयांची कर्जे मंजूर

(संग्रहित छायाचित्र)

तिमाहीत एक लाख लाभार्थीना २७८९ कोटी रुपयांची कर्जे मंजूर

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे कोविड १९ मदत उपायांतर्गत मार्च ते मे या तिमाहीत कृषी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्वसहायता गट, किरकोळ अशा एक लाख लाभार्थीना दोन हजार ७८९ कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली आहेत.

व्यावसायिक आस्थापनांचे दैनंदिन खर्च आणि वैधानिक थकबाकी पूर्ण होण्याकरिता आर्थिक तरलतेच्या (लिक्विडिटी) समस्येवर मात करण्यासाठी बँकेने उदार अटींवर सुलभ कर्ज वितरित केले आहे. कोविड १९ मदत उपायांतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच कृषी आणि किरकोळ विभागांना अतिरिक्त कर्ज साहाय्य दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांद्वारे घोषित केलेल्या प्रेरणा पॅकेजचा विस्तार करण्यासाठी आणि व्यापार तसेच व्यवसायांच्या पुनप्र्रारंभ कार्यकृतींना सहकार्य करून उत्तेजन देण्यासाठी बँकऑफ महाराष्ट्र पूर्णपणे सज्ज झाली आहे. जिव्हाळ्याची बँक, अनुकूल कर्ज योजना तसेच सुविधांसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि ‘एक कुटुंब’या संकल्पनेप्रमाणे कार्य करणा?ऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रने अत्यंत कार्यक्षमतेने एसएमएस, ईमेल,वेबिनार तसेच समर्पित संघभावना आणि शाखांकडून दूरध्वनीद्वारे प्रत्येक ग्राहकामधे जागरूकता वाढविण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. बँकेच्या सोयी सुविधांची माहिती देऊन ग्राहकांना साहाय्य करण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 5:49 am

Web Title: covid19 bank of maharashtra launches financial support schemes zws 70
Next Stories
1 Coronavirus: पुण्यात आज १७९ करोनाबाधित रुग्णांची भर; ७ रुग्णांचा मृत्यू
2 पिंपरी-चिंचवडमध्ये होमगार्ड कर्मचाऱ्याला टोळक्याकडून बेदम मारहाण
3 Coronavirus : रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकाला पोलीस अधिकाऱ्याने घडवली अद्दल
Just Now!
X