डॉक्टर असल्याची बतावणी

सह्य़ाद्री रुग्णालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याने डॉक्टर असल्याचे भासविल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी त्या जनसंपर्क अधिकाऱ्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
pune marathi news, pune bail marathi news
पुणे: बनावट कागदपत्रे तयार करून जामीनदार उभा करणे अंगलट; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महापालिकेच्या घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कर्वे रस्त्यावरील सह्य़ाद्री रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी अशोक भगवान घोणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोणे यांनी नवी दिल्लीतील कौन्सिल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसीन या संस्थेतून बॅचलर ऑफ अल्टरनेटिव्ह सिस्टीम ऑफ मेडिसीन ही पदवी मिळविली आहे. या पदवीला वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांकडून मान्यता नाही. घोणे हे डॉक्टर असल्याचे भासवत होते. संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला होता. त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार दिली होती.

महापालिके च्या बोगस वैद्यकीय व्यवसाय  शोधकार्य समितीकडून पडताळणी करण्यात आली होती. तेव्हा घोणे यांच्याकडे असलेली पदवी अधिकृत नसल्याचे उघड झाले. या समितीने घोणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. मात्र काही अधिकाऱ्यांकडून चालढकल केली जात होती.

अखेर महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी घोणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची सूचना दिल्यानंतर घोणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट १९६१ च्या कलमांअंतर्गत घोणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुचेता खोकले तपास करत आहेत.