27 September 2020

News Flash

फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा

स्वागत हॉलिडेमार्फत हिंगे पंधरवडय़ापूर्वी बंगळुरु, उटी आणि म्हैसूर येथे जाणार होते.

विमानतिकिटासाठी पैसे आकारुन तिकिट न देता फसवणूक करणाऱ्या एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकाविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी मोहन विष्णू मेढेकर, केदार मोहन मेढेकर यांच्यासह एका महिलेविरुद्ध (तिघे रा. वैजनाथ कॉम्प्लेक्स, मानाजीनगर, नऱ्हे) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अजित हिंगे (वय ४२, रा. नऱ्हे) यांनी यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्वागत हॉलिडेमार्फत हिंगे पंधरवडय़ापूर्वी बंगळुरु, उटी आणि म्हैसूर येथे जाणार होते. त्यांनी रेल्वेने प्रवास करण्यासाठी वातानुकूलित सुविधेची मागणी केली होती. परंतु त्यांना वातानुकूलित शयनयानचे तिकिट न मिळाल्याने विमानतिकिटाची मागणी केली होती.

विमानतिकिटासाठी मेढेकर यांनी जादा पैशांची मागणी केली. त्यानुसार हिंगे यांनी पैसे दिले. विमानतिकिट न दिल्याने त्यांनी मेढेकर यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांना मारण्याची धमकी दिली. मेढेकर यांनी माझी  ७१ हजार ६०० रुपयांची फसवणूक के ल्याचे हिंगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक बनसोडे तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 4:23 am

Web Title: crime against travel company director in cheating case
टॅग Cheating Case
Next Stories
1 तेरा संमेलनाध्यक्ष १३ जूनला एका व्यासपीठावर
2 घरात शौचालय नसल्याने माण गावच्या महिला सरपंचाचे पद रद्द
3 फरार साधकांना अटक करावी
Just Now!
X