आळंदी येथे सराईत गुन्हेगारावर भर दिवसा अज्ञात इसमांनी कोयत्याने सपासप वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. लंकेश ठाकूर वय-३० अस हल्ल्यात जखमी झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांचं मंदिर असून या परिसरात अश्या प्रकारचा हल्ला झाल्याने आळंदी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदीमध्ये दररोज हजारो वारकरी दाखल होतात. परंतु, आज झालेल्या घटनेमुळे राज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आळंदीत दाखल झालेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संत ज्ञानेश्वर माउली मंदिर परिसरात एका सराईत गुन्हेगारावर अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. ही गंभीर घटना भर दिवसा दुपारी आळंदी घाटावर घडली. या हल्ल्यात लंकेश ठाकूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुगणलायत उपचार सुरू आहेत. दरम्यान, लंकेशवर पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समजतंय. त्यांच्यावरील हल्ला गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून झाल्याचं सांगण्यात येत आहे.