News Flash

मार्केटयार्डातील व्यापाऱ्यावर वार करून रोकड लुटली

मार्केटयार्डातील किराणा माल विक्रेत्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून चोरटय़ांनी ५१ हजारांची रोकड लुटून नेली.

 

 

मार्केटयार्डातील किराणा माल विक्रेत्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून चोरटय़ांनी ५१ हजारांची रोकड लुटून नेली. मंगळवारी (२ ऑगस्ट) रात्री ही घटना घडली.

जीवन नानकचंद अगरवाल (वय ३७, रा.न्यू एरा सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, मार्केटयार्ड) यांनी यासंदर्भात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोन चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल यांचा मार्केटयार्डात किराणा माल विक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास ते दुकान बंद करून दुचाकीवरून घरी निघाले होते. वखार महामंडळानजीक दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटय़ांनी त्यांना अडविले आणि चाकूचा धाक दाखविला. अगरवाल यांच्या चेहऱ्यावर वार करून चोरटय़ांनी दुचाकीला लावलेली पिशवी हिसकावून नेली. पिशवीत अगरवाल यांनी ५१ हजारांची रोकड ठेवली होती. पोलीस उपनिरीक्षक एस.एस. धुमाळ तपास करत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी मार्केटयार्डातील एका व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या रोखपालाला धमकावून चोरटय़ांनी रोकड लंपास केली होती. या गुन्ह्य़ाचा अद्याप छडा लागलेला नाही. मार्केटयार्डातील व्यापारी लूटमारीच्या घटनांमुळे भयभीत झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 12:46 am

Web Title: crime in pune 14
Next Stories
1 जोरदार पावसामुळे खडकवासल्यातील विसर्गात वाढ, बाबा भिडे पूल पाण्याखाली
2 अविनाश भोसलेंसह सहा जणांवर गुन्हा
3 पुण्यात जोरदार पावसाची हजेरी!
Just Now!
X