वाचवण्याचा प्रयत्नात पतीही जखमी

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना एरंडवणे परिसरात सोमवारी (२७ जून) घडली. पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न करणारा पतीही होरपळला असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

मनीषा राहुल चोरगे (वय २८) आणि तिचा पती राहुल (दोघे रा. गणेशनगर, मेहेंदळे गॅरेजजवळ , एरंडवणे) असे होरपळलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. मनीषाच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याप्रकरणी राहुल याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषाने यासंदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षांपूर्वी मनीषाचा विवाह राहुल याच्याशी झाला होता. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. मनीषा मूळची सातारा जिल्ह्य़ातील आंबवडे गावची आहे. भावाच्या विवाहासाठी ती माहेरी गेली होती. विवाह पार पडल्यानंतर तिच्या लहान बहिणीचा विवाह निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे तिला सासरी येण्यास विलंब झाला. त्यामुळे राहुल तिच्यावर चिडला होता. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता.

सोमवारी रात्री त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. राहुलने मनीषाच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यानंतर त्याने मनीषाला वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राहुल होरपळला. दोघांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मनीषा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा तपास करत आहेत.c