News Flash

सहा लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणारे जेरबंद

विवेकराज यांनी मंगळवारी सकाळी मित्र अर्पित यांना पिंपरीतील विक्रांत लॉजच्या परिसरात भेटायला बोलाविले होते.

पिंपरीतील व्यापाऱ्याचे सहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी जेरबंद केले. व्यापाऱ्याचे अपहरण केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून २४ तासांत आरोपींचा छडा लावून त्यांच्या तावडीतून व्यापाऱ्याची सुटका केली.

फारूख अयुब शहा (वय ४०, रा. सुखवानी पार्क, भोसरी), कैलास रामचंद्र वारे (वय २४, सध्या रा. दिघी, मूळ रा.अंजन आवळी, ता. जुन्नर), संजय नरसिंग जोशी (वय ४२, रा. दिघी), महंमद हुसेन शेख (वय ३२, सध्या रा. दिघी मॅगझीन चौक, मूळ रा. उत्तर प्रदेश), इस्माईल अयुब शाह (वय ३१, रा. दिघी मॅगझिन चौक), अली मुबारक सय्यद (वय ३१, रा. चौधरी पार्क दिघी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पिंपरीतील व्यापारी विवेकराज विजयकु मार सिंग (वय ३०) यांचे मंगळवारी (१२ जुलै) अपहरण करण्यात आले होते. त्यांचे मित्र अर्पित विनोदकुमार खन्ना (वय ३३) यांनी यासंदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. विवेकराज यांनी मंगळवारी सकाळी मित्र अर्पित यांना पिंपरीतील विक्रांत लॉजच्या परिसरात भेटायला बोलाविले होते. विवेकराज आणि आरोपी इस्माईल शहा यांचे काही दिवसांपूर्वी पैशांवरून भांडण झाले होते. तेथे आरोपी इस्माईल आणि त्याचे साथीदार आले होते. आरोपींनी विवेकराजला धमकावून अपहरण केले. हा प्रकार अर्पित याने पाहिले आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली आणि सहायक आयुक्त राम मांडूरके यांनी या गुन्ह्य़ाचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपासपथकातील पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. आरोपींनी विवेकराज यांना बंडगार्डन रस्त्यावरील बँकेत नेले. तेथे धमकावून त्यांच्या खात्यातून पाच लाख रुपये काढले. त्यानंतर आरोपींनी अर्पित यांच्याशी संपर्क साधला आणि विवेकराज यांच्या सुटकेसाठी आणखी पैशांची मागणी केली. पोलिसांनी मध्यरात्री आरोपींना पकडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 3:58 am

Web Title: crime in pune 6
Next Stories
1 आजपासून पाच दिवस पाऊस कमी होणार
2 गतवर्षी धडा घेतल्याने पावसाळ्यात पुणे- मुंबई रेल्वे प्रवाशांचा खोळंबा टळला
3 अनेक अडचणींनंतर सोलापूरच्या हृदयरुग्ण बालिकेला पुण्यात दिलासा 
Just Now!
X