News Flash

रात्रीच्या वेळी वाहने अडवून लुबाडल्याच्या तीन घटना

शहरात वेगवगेळ्या ठिकाणी रस्त्यात अडवून लुटल्याच्या तीन घटना घडल्या असून यामध्ये एका मोटारीसह रोख रक्कम आणि ऐवज असा आठ लाखांच्या ऐवज चोरीला गेला आहे.

| April 14, 2014 02:55 am

शहरात वेगवगेळ्या ठिकाणी रस्त्यात अडवून लुटल्याच्या तीन घटना घडल्या असून यामध्ये एका मोटारीसह रोख रक्कम आणि ऐवज असा आठ लाखांच्या ऐवज चोरीला गेला आहे.
खराडी येथील घटनेत अनुभव अदिलकुमार श्रीवास्तव (वय ३२, रा. खराडी) हे मोटारीतून शनिवारी कामावरून रात्री साडेअकरा वाजता घरी येत होते. त्या वेळी त्यांना अर्बल सोल सोसायटीसमोर दुचाकी आडवी लावून त्यांना अडविले. त्या ठिकाणी मारहाण करून त्यांच्याच मोटारीत बसून त्यांना झेन्सार कंपनीच्या मैदानात नेले. या ठिकाणी श्रीवास्तव यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्याजवळील दोन सोन्याच्या अंगठय़ा, ब्रेसलेट, चेन, घडय़ाळ असा एकूण ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून दोघांच्या विरुद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेंगलोर-मुंबई मार्गावर बावधन येथे सचिन प्रकाश शिंदे (वय ३४, रा. निगडी) यांच्या मोटारीचा शुक्रवारी रात्री दुचाकीला पाठीमागून धक्का लागला. त्यामुळे दुचाकीवरील दोघांनी शिंदे व त्याच्या मित्र कोटगुंडे यांना मारहाण करून कोटगुंडे याच्याजवळील रोख वीस हजार आणि शिंदे यांच्याजवळील पाच हजार आणि मोटार असा एकूण सात लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच, देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड जकात नाक्याजवळ रणजित रूपचंद जैन यांना सुद्धा दुचाकीवरील दोघांनी शस्त्राचा धाक दाखवीत एक लाख ३८ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक एम. आर. खोकले हे अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 2:55 am

Web Title: crime loot police
Next Stories
1 भास्कर जाधव यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये – लक्ष्मण जगताप
2 अजितदादा व त्यांच्या बगलबच्च्यांनी वर्षांनुवर्षे पिंपरी पालिका लुटली – भापकर
3 मनसेच्या प्रचारात मराठी अभिनेत्रीही
Just Now!
X